kinwat today news

नांदेड(ब्रेकिंग): 9 मे रोजी आणखी सापडले 5 कोरोना पाझिटिव्ह रुग्ण; एक माहुरचा तर तिघे रहमतनगर नांदेड तर एक करबलाचा रुग्ण.एकूण 45

नांदेड:-(ब्रेकिंग) आज दिनांक 9 मे रोजी सायंकाळी 8 वाजता प्राप्त झालेले एकूण 5 थ्रोट स्वाब नुसार 5 ही पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत.
5 -पॉझिटिव्ह रुग्णांपैकी नांदेड शहरातील तीन रुग्णा पैकी दोन पुरुष प्रत्येकी वय( 14) वर्ष आणि एक महिला (वर्ष 32) हे दिनांक 3 /5 /2020 रोजी रहमतनगर नांदेड येथील कोरोना बाधित मृत महिलेच्या नजीकच्या संपर्कातील आहेत. सदर रुग्णाची प्रकृती स्थिर आहे .
एक रुग्ण वय वर्षे 61नांदेड शहरातील करबला भागातील असून त्यास दि.08/05/2020 रोजी पहाटे 4.30 वाजता सदर रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे त्याचा throt swab तपासणीसाठी पाठवला असता सदर रुग्ण हा पॉझिटिव्ह असल्याचा प्राप्त झाला आहे.
तसेच माहूर तालुक्यातील covid सेंटर येथे दाखल रुग्णाच्यापुरुष (वय वर्ष 64) swab तपासणी अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. सदर रुग्णाची प्रकृती स्थिर आहे .
आज प्राप्त 5 पॉझिटिव्ह अहवालामुळे नांदेड जिल्ह्यातील करुणा बाधित रुग्णांची संख्या ही 45 वर पोहोचली आहे.
तरी जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये आणि आवश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये. तसेच जिल्हा प्रशासनास मदत करावी. असे आवाहन डॉक्टर नीळकंठ भोसीकर जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड यांनी केले आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply