kinwat today news

ब्रेकिंग: 9 मे रोजी आणखी सापडले चार कोरोना पाझिटिव्ह रुग्ण; एक माहुरचा तर तिघे रहमतनगर नांदेड चे रुग्ण.एकूण रुग्ण 44.

नांदेड:-(ब्रेकिंग) आज दिनांक 9 मे रोजी सायंकाळी सात वाजता प्राप्त झालेले एकूण 4 थ्रोट स्वाब नुसार चार ही पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत.
चार-पॉझिटिव्ह रुग्णांपैकी नांदेड शहरातील तीन रुग्णा पैकी दोन पुरुष प्रत्येकी वय( 14) वर्ष आणि एक महिला (वर्ष 32) हे दिनांक 3 /5 /2020 रोजी रहमतनगर नांदेड येथील कोरोना बाधित मृत महिलेच्या नजीकच्या संपर्कातील आहेत. सदर रुग्णाची प्रकृती स्थिर आहे .
तसेच माहूर तालुक्यातील covid सेंटर येथे दाखल रुग्णाच्यापुरुष (वय वर्ष 64) swab तपासणी अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. सदर रुग्णाची प्रकृती स्थिर आहे .
आज प्राप्त 4 पॉझिटिव्ह अहवालामुळे नांदेड जिल्ह्यातील करुणा बाधित रुग्णांची संख्या ही 44 वर पोहोचली आहे.
तरी जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये आणि आवश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये. तसेच जिल्हा प्रशासनास मदत करावी. असे आवाहन डॉक्टर नीळकंठ भोसीकर जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड यांनी केले आहे.

*ग्रामीण भागातही कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ.घरातच रहा,सुरक्षा रहा.
सकाळी दोन रुग्ण सापडल्यानंतर सायंकाळी पुन्हा चार पाझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.चार पैकी तीन जण हे रहमतनगरचे असून एक जण माहुरचा आहे.
नांदेड शहरातच कोरोनाची लागण झाली असताना माहूर सारख्या ग्रामीण भागातही कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्याने कोरोनाने त्या भागातही हातपाय पसरवण्यास सुरुवात केल्याचे दिसून येते.
कोरोनाबाधितांच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे नागरिकांची धाकदुखी वाढत चालली असून माहुरमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने तो कोणाच्या संपर्कात आला याचा शोध आता घ्यावा लागेल.त्यामुळे ग्रामिण भागातील नागरिकांनी घाबरून न जाता घरीच राहणे दक्षता बाळगणे महत्त्वाचे आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply