तोंडारपाटी येथील तोंडार वस्ती राशन मदतीपासुन दुरच  जेवनासाठी घरी राशन नाही उपामार चालुच

किनवट टुडे न्युज।।(मोरे हाळी हंडरगुळी)
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नेय यासाठी पोलिस,प्रशासन यांचे काळजी पुर्वक प्रयत्न चालु आहेत.राज्यात वाढता प्रादुर्भाव पाहता शासनानास लाँकडाऊन वाढवावे लागत आहे. त्यामध्ये गरीब होतकरु नागरीकांना ज्यांचे हातावर पोट आहे त्यांना काही ठिकाणी सामाजिक संस्था,समाजसेवक,व शासनाकडून मदत करण्याचा प्रयत्न चालुच आहे.
मात्र उदगीर तालुक्यातील तोंडारपाटी येथील तोंडारवस्ती या ठिकाणी त्यांना मदत मिळु शकली नाही तेथे 50 च्या आसपास कुंटूब हातावर पोट असणारे कुंटूब आहेत काम केले तरच चुल पेटते या ठिकाणी वडर, वैदु,सोनार,कैकाडी,मातीवडर,फकीर,मागासवर्गीय आदी जमातीचे लोक राहतात.सोनार या जामातीचे हे नागरीक हातातील अंगठी,बाळाचे वाळवे,हातातील कंगण,महिलासाठी जोडवे,कानातील काडी,बनवण्याचे काम करतात. निजामबाद येथील रहीवासी 20 वर्षापासुन या ठिकाणी राहतात त्यांना स्व:चे छप्पर नाही कच्चे घर करुन राहतात.आजुबाजूच्या परीसरातील जत्रा,गावोगाव फिरुन विक्री करुन संसार भागवतात त्याच मिळणा-या मोबदला यावरच ते अवलंबुन असतात मात्र लाँकडाऊनमुळे विक्री व्यवसाय बंद असल्याने उपासमारीला लहान मुलांसह तोंड दयावे लागत आहे.तसेच मातीवडर जमातीचे लोक उदगीर नाक्यावर जाऊन जिकडे काम लागेल तिकडे जाऊन कुंटूबाची भुक भागवत होते,3 कुंटूब कैकाडी या जमातीचे आहेत सिंधाडी टोपली,दुरडी,कोंबडयाचे खुराडे,शेतीकामासाठी लागणारी डाल,बनवण्याचे व्यवसाय करतात मात्र लाँकडाऊनमुळे विक्री बंद आहे.काही मागासवर्गीय व्यक्ती रोजगार करतात.
पिण्याच्या पाण्याची सोय नाही लाईट व्यवस्था नाही,पाणी विकत तिन रुपयाला घागर घ्यावी लागते,दिवसेदिवस उन्हाळा वाढत आहे.हाताला काम नाही जवळ पैसा नाही पाणी कसे पिणार असा प्रश्न उभा आहे.वर्षभर पाणी विकत प्यावे लागते, लाँकडाऊन मुळे घराच्या बाहेर पडणे बंद आहे हाताला काम नाही कुंटूबात लहान मुलं आहेत त्यांच्या घरी राशन ही उपलब्ध नाही येथील कुंटूबावर उपासमारीची वेळ आली आहे दररोज उपासमार होत आहे.तालुक्याच्या जवळ असलेले हे ठिकाण आहे येथील ब-याच कुंटूबाकडे राशन कार्ड नाही म्हणुन शासनाच्या राशन पासुन वंचीत आहेत व कसलीही राशनची मदत नाही यासाठी येथील कुंटूबावर उपासमारीची वेळ आली आहे.
शासन व इतर सामाजिक संस्था समोर येऊन येथील कुंटूबाला मदत करावी अशी मागणी येथील कुंटूब करीत आहेत.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Anand Bhalerao (Editor in Chief) 9421585350. सूचना -- या इंटरनेट न्युज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखा मधून व्यक्त झालेल्या मताशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही.