kinwat today news

नांदेड (ब्रेकिंग): दि.8 मे रोजी आणखी 3 कोरोना पॉझिटिव्ह.एकून संख्या- 38 वर पोहचली.

नांदेड: आज दिनांक 8 मे (सकळी 9वा ) रोजी प्राप्त झालेल्या एकूण 23 throt swab नुसार 20 आहवाल निगेटिव्ह तर 3 तपासणी अहवाल हे पॉझिटिव्ह प्राप्त झाली आहेत.
पॉझिटिव प्राप्त अहवालानुसार दोन रुग्ण (महिला वय वर्ष 36 आणि पुरुष वय वर्ष 38) हे ये अबचलनगर नांदेड आणि एक रुग्ण (पुरुष वय 35 )हा रविनगर येथील रहिवासी आहे. हे सर्व रुग्ण अबचलनगर येथील सुरुवातीस बाधित असलेल्या रुग्णाच्या निकटवर्तीय संबंधातील आहेत.
काल दिनांक 7 मे 2020 रोजी covid-19 आजाराच्या मार्गदर्शक सूचनांनुसार त्यांचे दुसऱ्यांदा swab घेण्यात आले होते. यापूर्वी प्रथमतः घेण्यात आलेले त्यांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह झाले होते.
सध्यास्थितीत सदर तिन्ही रुग्णावर यात्री निवास कोविड सेंटर येथे उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे .आज प्राप्त तीन पॉझिटिव्ह अहवालामुळे नांदेड जिल्ह्यातील कोरणा बाधित रुग्णाची संख्या ही 38 वर पोहोचली आहे.
तरी जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये. आणि आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. तसेच जिल्हा प्रशासनास मदत करावी. असे आवाहन डॉक्टर नीळकंठ ईश्वरराव भोसीकर जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालय नांदेड यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply