kinwat today news

सोशल डिस्टन्स ठेऊन,सर्वांच्या तोंडाला मास्क लावून; जुनेच कपडे अंगावर वापरुन खर्चाविना विवाह संपन्न

किनवट/प्रतिनिधी— प्रधानसांगवी येथिल चि.ओम विठ्ठल किरवले आणि चि.सौ.कां. राऊबाई पिता माधव डोईफोडे यांचे प्रकरण किनवट पोलीसात पोहोचल्यानंतर सामोपचाराने प्रकरण मिटले. बुधवारी (६ मे २०२०) रात्री उशिराने का होईना अखेर विवाह सोहळा पार पडलाच. प्रधानसांगवीवाशियांनी या नवदाम्पत्यांवर भरभरुन शुभेच्छांचा वर्षाव केला.
प्रधानसांगवी येथिल ओम किरवले आणि राऊबाई डोईफोडे यांनी ऋणानुबंधनासाठी प्रयत्न केले परंतु ऐनवेळी कांही अडचणी उदभवल्याने ताणाताण होऊन प्रकरण दि.६ मे २०२० दुपारी किनवट पोलीसात पोहोचले. वधु-वराच्या भावना लक्षात घेऊन गावातील कांही सूज्ञ नागरिकांसह पोलीसांनी संध्याकाळपर्यंत सामोपचारातून आपशी ताळमेळ बसऊन विवाह सोहळ्यासाठीचा मार्ग मोकळा केला. रात्री उशिराने ग्रामस्थांच्या साक्षीने महादेव मंदिरातच विवाह सोहळा संपन्न झाला.
चि.ओम विठ्ठल किरवले आणि चि.सौ.कां.राऊबाई माधव डोईफोडे यांचाही विवाह सुद्धा सोशल डिस्टन्स समानांतर ठेवला होता. सर्वांच्या तोंडाला मास्क, असे अनेक सोपस्कार पूर्ण करुन जुनेच कपडे अंगावर वापरुन विवाह पार पडला. खर्चाविना लग्न पार पडले. या नवदाम्पत्यावर प्रधानसांगवीवाशियांनी भरभरुन शुभेच्छांचा वर्षाव केला.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply