kinwat today news

आत्माराम पाटील मुंडे हे दोन किलोमीटर पाईपलाईन करून भागवत आहेत वन्य प्राण्यांची तहान.

किनवट टुडे न्युज,: किनवट तालुका जंगलाने व्यापलेला असून यात अनेक वन्यप्राणी वास्तव्यात आहेत मोर, लांडोर, डुक्कर ,काळवीट, हरिण, सांबर, अस्वल, वानर ,बिबट्या, व इतर प्राणी आहेत. सध्या मे महिन्याचा खडक उन्हाळा असल्यामुळे जंगलातील पाण्याचे स्त्रोत आटत चाललेले आहेत. त्यामुळे वन्य पशुपक्षांना पिण्यासाठी पाणी मिळणे अवघड होऊन बसले आहे.
याबाबतीत वनविभागाला वारंवार वन प्रेमींनी सूचना देऊनही या महत्त्वपूर्ण बाबीकडे दुर्लक्षच होत असल्यामुळे आता वन प्रेमी जनता पुढे होऊन वन्यप्राण्यांसाठी आपण काहीतरी केले पाहिजे या हेतूने पुढे सरसावले आहेत.
नागझरी ता.किनवट येथील प्रतिष्ठित शेतकरी तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य आत्माराम पाटील मुंडे यांनी आपल्या शेतापासून जवळजवळ दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या एका वन्यतळ्यामध्ये आपल्या स्वतःच्या विहिरीवरून स्वतःच्या मोटारीने पाईपलाईन करून या तळ्यामध्ये पाणी सोडलेले आहे. या तळ्यात 6 फूट खोल व जवळ जवळ दोनशे ते अडीचशे मिटर लांब आहे. या तळ्यामध्ये संपूर्ण पाणी भरलेले असल्यामुळे याठिकाणी जंगलातील शेकडो पशुपक्षी येथे येऊन आपली तहान भागवत आहेत.
आत्माराम पाटील मुंडे ते गेल्या अनेक वर्षापासून अशा प्रकारे जंगली जनावरांना पाणी पाजण्याचे एक सर्वोत्कृष्ट काम करीत असल्यामुळे त्यांचे किनवट तालुका व परिसरातून कौतुक होत आहे.
आत्माराम पाटील मुंडे यांचा आदर्श इतरांनीही घ्यावा जेणेकरून कडक ऊन्हाळ्यात जंगलातील कोणताही प्राणी पाण्याविना तडफडून मरणार नाही.तसेच किनवट तालुक्यातील संपूर्ण जंगलात जुने व नवे पाणवठे तयार करून त्यात पाणी पुरवठा नियमित करावा.जेणेकरून वन्यप्राणी मानव वस्ती कडे येणार नाहीत.अशी अपेक्षा वन्यजीव प्रेमी जनता करीत आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply