kinwat today news

दि.6 मे रोजी नांदेड मध्ये आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह; एकूण रुग्ण 35 पैकी 4जणांचा मृत्यू.

नांदेड: आज दिनांक 6 मे 2020 रोजी 32 अहवाल प्रलंबित होते परंतु आता प्राप्त 23 अहवालानुसार 22 संशयित व्यक्तींचे अहवाल हे निगेटिव प्राप्त झाले असून अबचलनगर तालुका जिल्हा नांदेड येथील रहिवासी पुरुष रुग्णाचा वय 56 वर्षे अहवाल हा पॉझिटिव्ह प्राप्त झाला .सदर रुग्णास एन. आर. आय. यात्री निवास येथे दिनांक 3 मे 2020 पासून अलगीकरण कक्षात दाखल करण्यात येऊन दिनांक 3 मे 2020 रोजी swab तपासणीसाठी पाठवण्यात आला असता त्या अहवालाचा निष्कर्ष निघाला नाही.
परंतु सदर व्यक्तीस आज दिनांक 6 मे 2000 20 रोजी सकाळी 8:30 ते 9च्या दरम्यान अती गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालय नांदेड येथे दाखल करण्यात आले असताना तात्काळ सर्व उपचार करूनही संबंधित रुग्नाद्वारे औषधोपचारास योग्य तो प्रतिसाद न दिल्यामुळे त्यास तात्काळ डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे संदर्भित केले असता रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच रुग्ण मृत्यू पावला.
सदर रुग्णास अतिउच्च रक्तदाब तसेच हृदयरोगाचा त्रास असल्याने असल्याचे निदर्शनास आलेले आहे.सदर रुग्णाचा आज सकाळी swab तपासणीसाठी घेतला असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 35 वर गेली आहे.
करिता आवश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे डॉक्टर निळकंठ भोसीकर जिल्हा शल्यचिकित्सक नांदेड यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply