ज्येष्ठ नेते के.मूर्ती यांच्या पुढाकाराने पूर्व नियोजित केलेला विवाह सोहळा साधेपणात संपन्न

किनवट टुडे न्युज।।
करोना’ची साथ रोखण्यासाठी शासनस्तरावर शर्थीचे प्रयत्न होत असताना मोठे लग्न करून कोणाचा जीव धोक्यात टाकणे उचित नाही.या उद्देशाने किनवट चे माजी नगराध्यक्ष काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते ते मूर्ती यांच्या पुढाकाराने आज दिनांक 6 रोजी साठे नगर भागात पूर्वी नियोजित केला गेला विवाह सोहळा साधेपणात साजरा करून आदर्श निर्माण केला आहे.

लग्न म्हंटल, की प्रत्येक नवरदेव-नवरीला आपला विवाह थाटामाटात व्हावा, अशी इच्छा असते. मात्र, कोरोनामुळे त्यांच्या या इच्छांमध्ये विर्जन पडलं. याच काळात किनवट शहरातील साठे नगर भागात राहणारे शिवलिंग अलेनवार यांचा मुलगा अजय व माहूर तालुक्यातील सेलू (करंजी) येथील गंगारेड्डी कोत्तूरवार यांची कन्या चि. सौ.का सुकेसाना या दोघांचा विवाह आज दुपारी किनवट येथे संपन्न झाला.माजी नगराध्यक्ष के.
मूर्ती यांच्या पुढाकाराने सर्व नियमाचे पालन करून वधूवरांना विवाहाच्या बंधनात बांधून त्यांच्या पुढील सुखी जीवनासाठी मोजक्याच आलेल्या पाहुण्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी के मूर्ती यांचे चिरंजीव हे स्वामी व इतर घरातील ठराविक दोन ते चार नातेवाईक या आदर्श विवाह सोहळ्यात उपस्थित होते.अनाठाई खर्चाला इतर कार्यक्रमाला फाटा देत हा विवाह सोहळा साठे नगर भागात संपन्न होत असताना शासन नियमाची खबरदारी घेत सोशल डिस्टनसिंग पाळत हे लग्न उरकलं. लॉकडाउनच्या सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन केलं गेल्याने या विवाह सोहळ्याचे सर्वत्र चर्चा होत आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Anand Bhalerao (Editor in Chief) 9421585350. सूचना -- या इंटरनेट न्युज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखा मधून व्यक्त झालेल्या मताशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही.