kinwat today news

कोरोना वॉरिअर फौजदाराचा टरबूज कापून वाढदिवस साजरा

हदगाव:- (गोलु पवार हदगांव)
कोरोना संकटाशी मुकाबला करणाऱ्या पोलीस फौजदाराचा वाढदिवस कर्मचाऱ्यांनी अनोख्या पद्धतीने साजरा क रून त्यांना कुटुंबीयांची उणीव भासणार नाही याची काळजी घेतली आहे. तामसा येथील पोलिस ठाण्यातील फौजदार रामराव जेगाडे यांचा ता. एक मे रोजी वाढदिवस होता. पण कोरोना संकटामुळे जेगाडे हे कर्तव्य पालन करण्यासाठी कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय वाढदिवस साजरा करून त्यांना शुभेच्छा देऊ शकत नव्हते. पण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव मद्दे यांनी फौजदार जेगाडे यांना कुटुंबीयांची उणीव भासणार नाही व त्यांचा वाढदिवस साजरा होऊन लक्षात राहील असा साधा पण अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचे नियोजन केले. ठाण्यात समोरील जागेत फौजदार जेगाडे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी सोशल डिस्टन राखून टाळ्यांचा गजर केला. यावेळी वाढदिवसाचे प्रतीक असलेला केक नव्हता. पण केकमुळे वाढदिवसाचा आनंद कमी होऊ नये म्हणून केकची जागा टरबूजाने घेतली. फौजदार जेगाडे यांच्या हस्ते टरबूज कापून वाढदिवस उत्साहात साजरा झाला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मद्दे यांनी फौजदार जेगाडे यांना टरबुजाची फोड खाऊ घालून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या अनोख्या व संस्मरणीय वाढदिवसामुळे फौजदार जेगाडे कमालीचे भारावले होते. आपल्या कुटुंबीयाशिवाय वाढदिवस साजरा होण्याचा आनंद त्यांच्या पाणावलेल्या डोळ्यातून स्पष्ट दिसत होता.पोलीस कर्मचाऱ्यांचे कौटुंबिक वातावरण येथे वाढदिवसानिमित्त बघायला मिळाले.या अनोख्या वाढदिवसाची चर्चा मात्र जोरात झाली. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रामदास बोंदरवाड, माधव नारेवाड, काँग्रेसचे सर्कल गोविंद पवार, पत्रकार शशिकांत धानोरकर ,बसव बिग्रेडचे तालुकाध्यक्ष अतुल राऊतराव, दीपक देशमुख, सलीम चौधरी आदी उपस्थित होते.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply