kinwat today news

किनवट शहरात विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिक त्रस्त.

किनवट टुडे न्युज।।
शहराचे तापमान 45 डिग्री अंशापर्यंत पोहचले असताना कडक उन्हाळ्यात विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरात गेल्या महिनाभरापासून विजेचा सातत्याने लपंडाव होत आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीस शहराच्या कमाल तापमानात वाढ होत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला 40 ते 45 अंश पर्यंत पोहोचले आहे. सकाळी पाणीपुरवठा च्या वेळी विद्युत खंडित राहत असल्यामुळे लोकांना पाण्याची भटकंती करायची वेळ आली आहे. सध्या रमजान महिना सुरू असल्यामुळे आणि रोजंदारी संख्या लक्षणीय असल्यामुळे वाढत्या तापमानात लोक पाण्याविना व्याकुळ झाले आहेत. आमदार भीमराव केराम यांनी मंत्र्यांसह वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे किनवट माहूर तालुक्यातील वीजपुरवठा अखंडितपणे चालू ठेवण्याची मागणी केली आहे. तरीही विद्युत वीज कंपनीच्या अधिकार्‍यांमध्ये काही फरक पडलेला आढळून येत नाही जर असाच सतत वीज पुरवठा खंडीत होत राहील्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसचे सरचिटणीस मतीन कुंदन यांनी दिला आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply