कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी   गुरुद्वारा परिसरातील कंटेनमेंट झोनमध्ये  नियोजनासाठी पाच अधिकाऱ्यांची नियुक्ती

नांदेड, (जिमाका) दि. 5 :- नांदेड वाघाळा महानगरपालिका आयुक्‍त यांनी महानगरपालिका हद्दीतील नगिनाघाट गुरुद्वारा परिसर या क्षेत्रामध्‍ये कोविड-19 चे रुग्‍ण आढळून आल्‍यामुळे नगिनाघाट गुरुद्वारा परिसर, गुरुद्वारा लंगरसाहेब कंपाऊंड, बडपुरा, शहिदपूरा, रामकृष्‍ण टॉकिज, परिसर या क्षेत्रामध्‍ये संसर्गाचा इतरत्र प्रसार होऊ नये म्‍हणून हे क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून घोषीत केले असून येथे विविध उपाययोजना व नियोजनासाठी पाच अधिकाऱ्यांची नियुक्‍ती जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी एका आदेशाद्वारे केली आहे.

या क्षेत्रात विविध उपाययोजना व नियोजनासाठी नियुक्‍ती करण्‍यात आलेल्या या पाच अधिकाऱ्यांमध्ये नांदेडचे उपविभागीय दंडाधिकारी तथा इंन्सिडंट कमांडर लतिफ पठाण, नांदेड शहर उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित फसके, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका प्रभारी उपायुक्‍त (सा.) अजितपालसिंघ संधू, नांदेड मनपा झोन क्र. 4 वजिराबाद प्रभारी क्षेत्रीय अधिकारी प्रकाश गच्‍चे तर नांदेड वाघाळ शहर महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बदियोद्दीन यांचा समावेश आहे.

या घोषीत केलेल्‍या कंटेनमेंट झोन (Containment Zone) मध्‍ये कोरोना रोगाचा प्रसार रोखण्‍यासंबंधाने तपशीलवार धोरण, करावयाच्या उपाययोजना वेळोवेळी जाहीर करण्‍यात आले असून त्‍याबाबत आरोग्‍य विभागाने सुध्‍दा प्रमाणित कार्यपध्‍दती जाहीर केली आहे.

सदर नियुक्त अधिकारी यांनी कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्‍यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तसेच शासन, आरोग्‍य विभागाकडून प्राप्‍त सुचनेनुसार नियोजन करुन केलेल्‍या कार्यवाहीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयास वेळोवेळी अवगत करावे. जे कोणी व्‍यक्‍ती, समुह सदर आदेशाचे उल्‍लंघन करील, त्‍यांचे विरुध्‍द आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम, 2005 अन्‍वये व भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार कार्यवाही करण्‍यात येईल, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी काढले आहे.

राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हिड 19) प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी राज्‍यात साथरोग प्रतिबंधात्‍मक कायदा 1897 दि. 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2, 3 व 4 मधील तरतुदीनुसार 14 मार्च 2020 रोजी अधिसुचना निर्गमित केली आहे. त्‍यानुसार कोरोना विषाणूचा रोगाचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी जिल्हाधिकारी यांना ज्‍या उपायोजना करणे आवश्‍यक आहे त्‍या करण्‍यासाठी सक्षम प्राधिकारी म्‍हणून घोषित केले आहे. त्‍यानुषंगाने या कंटेनमेंट झोन मध्‍ये विविध उपाययोजना व नियोजनासाठी सदर अधिकारी यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे, असेही आदेशात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नमूद केले आहे.

00000

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Anand Bhalerao (Editor in Chief) 9421585350. सूचना -- या इंटरनेट न्युज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखा मधून व्यक्त झालेल्या मताशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही.