kinwat today news

दिव्यांग बांधवाचा राखीव निधी देण्याबाबत लेखी आदेशाला दाखविली केराची टोपली. दिव्यांगाना न्याय मिळेल काय?-

किनवट टुडे न्युज।। दिव्यांग बांधवाना करोना संकटकाळी सर्व सामान्य जनतेसारखे स्वबळावर जीवन जगता यावे या उद्देशाने शासनाने दिव्यांग हक्क कायदा 2016 च्या नियमानुसार ग्रामपंचायत, नगरपंचायत नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हापरिषद, महानगर पालिका येथील दिव्यांगाना 5 टक्के राखिव स्वनिधीे अधिक चोदावा वित विकास निधि दिव्यांग कायदा 2016 व शासन निर्णय 1 ते 6 निर्णय व उपमुख्यकार्यकारी अधिकारी साहेब पंचायत विभाग जिल्हा परिषद नांदेड यांचे 27 वेळा लेखी आदेश व वारंवार आदेश देऊनही दिव्याग बांधवाना त्यांचा हक्क व न्याय मिळाला नाही. अशा संकटकाळी तरी मिळेल काय? वरिष्टाचे आदेशाची पायमल्ली करणाऱ्या अधिकाऱ्यावर काय कार्यवाही
होणार?
नांदेड जिल्ह्यातील सर्व तालूक्यात प्रत्येक गावात दिव्यांग निधी वाटप होत नसल्यामूळे मा. डाकोरे पाटिल यांनि वारंवार शासन दरबारी अनेक निवेदन, भेटि,चर्च्या बेमुदत धरणे आंदोलन, अर्धनग्न आंदोलन, आक्रोश मोर्चा, झोपा काढो आंदोलन, बोम्ब मारो आंदोलन, भीक मांगो आंदोलन,मुंडण आंदोलन, कुलुप लाओ आंदोलन इत्यादि 58 आंदोलन करून पाठपूरावा केल्यामूळे
उपमूख्यकार्यकारी पंचायत विभाग जि.प. नांदेड यांनी सर्व गटविकास अधिकारि यांना सं.अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांच्या निवेदनाचे संदर्भ टाकून दिव्यांग निधी त्वरित वाटप करून अहवाल सादर करण्याच्या सूचना वारंवार सताविस लेखी आदेश देऊन व प्रत्येक मिटिंग मध्ये सूचना दिल्या. मा जिल्हाकधिकारी डोंगरे साहेबानी दिव्यांग निधि संदर्भित दोन वेळा अढावा बैठक घेऊन आदेश करून सूध्दा दिव्यांग बांधवाना हक्काचा 2016 पासुन दरवर्षि देण्यात येणारा दिव्यांग नीधी जिल्हा परिषद ने एका वर्षाचा निधी सातशे दिव्यांगाना प्रत्येकी विस हजार रु.वाटप केला.
उर्वरित निधी तत्काळ वाटप करण्यात यावा. तसेच निधी वाटप न करणाऱ्या दोषी अधिकार्यावर कार्यवाहि करून दिव्यांग बांधवाना न्याय दयावा असे चंपतराव डाकोरे पाटिल यांनी प्रसिद्धीपत्रका द्वारे आपले मत व्यक्त केले आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply