kinwat today news

ब्रेकिंग:आज दि.4 मे रोजी आणखी तीन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह. एकूण संख्या 34 .

नांदेड: आज दिनांक 4 मे रोजी सायंकाळी 05 वाजता वाजेपर्यंतची कोरोना विषयाक माहिती नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली.
एकूण घेण्यात आलेल्या स्वाब 1329 पैकी 1208 निगेटिव्ह असून 62 स्वाब चा अहवाल प्रलंबित आहे. आजतागायत एकूण 05 स्वाब तपासण्याची आवश्यकता नसल्याचा निर्वाळा दिला आहे. पैकी एकूण 34 रुग्णाचा स्वाब पॉझिटिव्ह आहेत.34 पैकी औषधोपचारास प्रतिसाद न दिल्याने एकूण 3 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
आता प्राप्त झालेल्या अहवाला पैकी गुरुद्वारा परिसरात आणखी तीन व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव प्राप्त झाला आहे. सदर रुग्णावर औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्यास्थितीत स्थिर आहे.
तरी जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये; तसेच जनतेने मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नये;आवश्यक कारणाशिवाय बाहेर पडू नये आणि प्रशासनास मदत करावी. असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नीळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply