kinwat today news

कोरोना व्हायरस पार्श्वभूमीवर नांदेड जुना मोंढा होलसेल मार्केट दोन दिवस बंद

नांदेड:- मागील 42 दिवसांपासून म्हणजे लॉक डाऊन झाल्यापासून जुना मोंढा मार्केट सतत चालू होते. आता सर्व लोकल किराणा दुकानात घराकडे मालाचा भरपूर स्टॉक आहे. जुना मोंढा मार्केट मध्ये खूप गर्दी होत आहे.तसेच प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे व सोशल डिस्टन्ससिंगच्या नियसमांचे पालन होत नाही. करोना या विषाणूजन्य रोगाची चैन तुटणे महत्वाचे आहे. गेल्या दोन दिवसापासून नांदेडमध्ये कोरोना या संसर्गजन्य रोगाचा झपाट्याने प्रार्दुभाव होत आहे. तरी सर्व व्यापाऱ्यांनी सोमवार दिनांक 5 मे मंगळवार व दिनांक 6 मे बुधवार रोजी आपापली सर्व दुकाने बंद ठेवावित असे आव्हान जुना मोंढा मार्केट होलसेल मर्चंट असोशियन चे अध्यक्ष सुरेश भराडिया व सचिव राजाराम पांचाळ यांनी केली आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

5 thoughts on “कोरोना व्हायरस पार्श्वभूमीवर नांदेड जुना मोंढा होलसेल मार्केट दोन दिवस बंद

Leave a Reply