kinwat today news

किनवट येथील दिनांक २४ मे २०२० रोजी होणार मातंग समाज सामुहिक विवाह सोहळा कार्यक्रम रद्द

किनवट टुडे न्युज।। – किनवट येथे गेल्या १० वर्षापासुन साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेद्वारे मातंग समाज सामुहिक विवाह सोहळा संपन्न करित आहे. हया वर्षो सुध्दा दिनांक २४ मे २०२० रोजी रविवार १२.३५ मिनीटानी हा विवाह सोहळा आयोजीत केला होता. सतत सहा महिन्यापासुन कार्यकर्ते हा विवाह सोहळा आयोजीत करण्यासाठी आहो-रात्र मेहनत घेत होते परंतु नियतीला हे मान्य नव्हते. कारण सर्व जगामध्ये कोरोना व्हायरस हा संसर्गजन्य रोग हा-हा मनंता सगळीकडे पसरला सर्वांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.हया संसर्गजन्य रोगावर मात करण्यासाठी लाॅकडाऊन पर्याय असल्यामुळे सर्व सण-त्योहार, जयंत्या घरी राहुनच साजर्‍या कराव्या लागत असल्याने शासनाचे नियम पाळून आम्हाला हा विवाह सोहळा अतिशय दु.खी अंतकरणाने व नाईलाजास्तव रद्द्द करावा लागत आहे. दर वर्षी २०-२५ जोडपे हया विवाह सोहळयात भाग घेत होते हया मुळे समाज बांधवाचा वेळ आणि पैसा वाचला जात होता हया विवाह सोहळ्याच्या संदर्भात किनवट नगरीचे नगराध्यक्ष आनंदभाऊ मच्छेवार यांच्याशी विचार-विनीमय करुन हा विवाह सोहळा रद्द करण्यांचे ठरविले असे आयोजन समितीचे अध्यक्ष रविकुमार आयनलवार संयोजक मधुकर आनेलवार व आयोजक लक्ष्मीपती दोनपेल्लीवार यांनी सांगीतले.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply