kinwat today news

अतिदूर्गम डोंगरी दरीतील वंचितांच्या असहाय विधवा,निराधार, वृध्द महिलांना अभियंता प्रशांत ठमके यांनी दिली अन्नधान्याची मदत

किनवट / तालुका प्रतिनिधी : तालुक्यातील अतिदूर्गम डोंगरदरीत वसलेल्या मोहपूर -ुकुपटी परिसरातील सहा गावातील वंचित समाजघटकातील असहाय विधवा, निराधार व वृध्द महिलांसह एकशे दोन कुटूंबांना भारतीय बौध्द महासभेचे तालुकाध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके यांनी अन्नधान्य वाटप करून लॉकडाऊनमुळे उपाशीपोटी राहणारांना मायेचा आधार दिला आहे.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत असलेल्या नामांकित इंग्रजी माध्यमाची शाळा ‘मातोश्री कमलताई ठमके इंग्लिश स्कूल, कोठारी ( चि) ‘ या शाळेच्या संस्थेचे अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके यांनी या शाळेत शिकणाऱ्या अतिमागास कोलाम समाजातील पाच विद्यार्थ्यांच्या आई – वडिलांसह लॉकडाऊनमुळे उपासमार होणाऱ्या छप्पन्न कुटूंबांना अतिदुर्गम काझीपोड व पळशीडाग येथे जाऊन यापूर्वीही अन्नधान्य वाटप केले आहे.
समाजऋण फेडण्याच्या उद्देशाने त्यांनी त्यांच्या अर्धांगिणी प्राचार्या शुभांगी ठमके व सुपुत्र सुशांत ठमके यांच्यासमवेत प्रत्येकी एक किलो मुगदाळ, मसूरदाळ, गूळ, खाद्यतेल, मीठ, पाच किलो तांदूळ, चहापत्ती, हळद, मिरची पावडर, बिस्कीट,अंघोळीचा व कपड्यांचा साबूण अशा अन्नधान्य साहित्याची किट वाटप केली.
यावेळी कोरोना नियंत्रण जनजागृती व मिडीया कक्षाचे सहायक उत्तम कानिंदे यांनी माहिती दिली व सूत्रसंचालन केले. सावित्रीबाई फुले विचार मंचच्या अध्यक्षा प्राचार्या शुभांगी ठमके यांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी घ्यावयाच्या काळजीबद्दल सर्व ग्रामस्थांना सविस्तर मार्गदर्शन केले. महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य राजाराम वाघमारे व समता सैनिक दलाचे तालुका उपाध्यक्ष केंद्रिय शिक्षक राहूल उमरे यांनी कोरोनाविषयी जनजागृती संदेश दिला. बौध्द महासभेचे तालुका सरचिटणीस महेंद्र नरवाडे यांनी ‘ महामारीने कहर केला… ‘ हे गीत गाईले.
याप्रसंगी मुख्याध्यापक रवि भालेराव, आनंदा भरणे, सम्यक कांबळे, सुधाकर राऊत, समाधान हरणे, भीमराव राऊत, उपसरपंच सिध्दार्थ कवडे आदींसह लाभार्थी फिजिकल डिस्टंन्सिगचं पालन करून उपस्थित होते.
बौध्द, आदिवासी, बंजारा व वंचित घटकातील गावनिहाय लाभार्थी ( कुटूंब ) : पांधरा ( दोन ), आंजी ( 13), सिंदगी ( 24), मोहपूर ( 21), साकूर ( 20 ) व कुपटी ( 22 )आदी.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply