kinwat today news

प्रोफेसर डॉ खुशाल गणपतराव कारामुंगे यांनी नियत वयोमानानुसार आपले सेवा पूर्ण करून झाले सेवानिवृत्त

किनवट (प्रतिनिधी)-ब.पा.महाविध्यालयातील प्रोफेसर डॉ खुशाल गणपतराव कारामुंगे रसायनशास्त्र विभाग प्रमुख बळीराम पाटील महाविद्यालय किनवट यांनी नियत वयोमानानुसार आपले सेवा पूर्ण करून ते 30 एप्रिल 2020 रोजी सेवानिवृत्त झाले त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची उत्कृष्टपणे सेवा पार पडली त्याबद्दल किनवट शहर व तालुक्यातील माजी विद्यार्थी व मित्र मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. – नवघरवाडी, ता. कंधार जि.नांदेड येथील मूळचे रहिवासी असलेले प्राध्यापक कारामुंगे शिक्षण 1 ते 4 जि. प.प्रा. शा. नवघरवाडी 5 ते 7 पानभोसी ता. कंधार ८ वी ते १० जिल्हा परिषद हायस्कूल कंधार ११ ते 12 शिवाजी काँलेज कंधार, बि. एस्सी. सायन्स काँलेज नांदेड, बि. एड. शासकीय अद्यापक महाविद्यालय नांदेड एम.एस्सी. मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण पुर्ण करून नांदेड जिल्ह्यापासून 150 कि.मी. दूर असलेल्या आदिवासी, नक्षलग्रस्त, अतिदुर्गम तालुक्याच्या ठिकाणी वसलेला ” बळीराम पाटील काँलेज किनवट, जि. नांदेड ” येथे “कनिष्ठ प्राध्यापक ” म्हणून 1988 ला नेमणूक1990 वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक 2007 P. hd (डॉ. वाय. बी. विभुते सर नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली ) झाली. त्यांनी येथेInternational Conference मध्ये Indonesia व Bangkok येथे Research Paper वाचन केले.दयानंद काँलेज, लातूर येथे ” उत्कृष्ट पेपर वाचक ” म्हणून पुरस्कार,किनवट सारख्या दुर्गम भागात वसुरुवातीला कोणत्याही सुविधा नसताना (उपलब्ध असलेल्या शैक्षणिक साहित्यातून पदवी चे शिक्षण देऊन) त्यांनी आपल्या कार्यकाळात हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याचे काम केले त्यांचे मार्गदर्शन घेऊन अनेक विद्यार्थी विविध अशा उच्च पदावर कार्यरत आहेत असे मार्गदर्शन करणारे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक (गुरु) श्री कारामुंगे सर हे 33 वर्ष ” शैक्षणिक सेवा ” पुर्ण करून नियत वयोमानानुसार आज दि. 30/4/2020 रोजी “सेवानिव्रुत्त झाले. त्याबद्दल त्यांचा किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड, प्राचार्य बेंबरेकर, उपप्राचार्य राजकुमार नेमानीवार, प्रा डॉ लांब, प्रा सोमवंशी,प्रा किशन मिराशे,प्रा डॉ वानखेडे, प्राअनिल पाटील, प्रा उत्तरवार प्रा खूपसे, मंदाकिनी राठोड, प्रा विनायक पवार प्रा ममता जोनपेंलीवार,प्रा डा दिवे,प्रा डा भास्कर दवणे, प्राचार्य बेटकर, प्रोफेसर लोणकर, ,प्रा डॉ विजय भोसले प्रा डा ढगे, प्रा डॉ योगेश नलवार प्राचार्य रेड्डी , प्रा विजय कानवडे, प्रा शेखर घुंगुरवार, प्रा वायाळ, प्रा सर सूनिल व्यवहारे , प्रा डा शिंदे,प्रा चंदेले,प्रा खाडे, प्रा डा भुसारे, प्रा.बी आर पाटील, संजय घुमटकर, खंडू रेणके, डा जामकर , यशवंत मंगनाळे, खंडोजी पांडागळे, गुरुवर्य मधुकर रुद्रवार
शिवराजअप्पा राघु, अनिल भंडारे, विठ्ठल फुलवळे, सोमेश्वर शिरगिरे, यांनी त्यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे. किनवट शहरातील लिंगायत समाजाचे कार्यकर्ते सतीश बिराजदार आनंद सोनटक्के संजय बिराजदार शत्रुघ्न भालके यांच्या वतीने सत्कार करण्यात आला

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply