सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनय गोयल यांची कोरोना विषाणू विषयी जनजागृतीसाठी मांडवी परिसराला दि.30 एप्रिल रोजी भेट

मांडवी प्रतिनिधी: (इंद्रापाल कांबळे)
कोरोना विषाणू व अन्य आजाराविषयी जनजागृती व व्यवस्थापन नियोजन दौरा अंतर्गत सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी मांडवी परिसराला दि.30एप्रिल रोजी भेट दिली.
मांडवी परिसरातील ग्रामीण भागात जर कोरोना विषाणू संसर्गजन्य आजाराची लक्षणे दिसल्यास उपाययोजना करण्यासाठी आज मांडवी आरोग्य केंद्र कै.बळीराम पाटील ग्रामीण रुग्णालय, मांडवी येथे भेट देऊन तेथील वैद्यकीय सुविधेबद्दल माहिती जाणून घेऊन योग्य ती सूचना करण्यात आल्या. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम राठोड याना सूचना देण्यात आले व तसेच मांडवी परिसराचे अन्य ठिकाणी भेट देत असताना मांडवी परिसरातील डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी विक्रम राठोड व प्राथमिक आरोग्य केंद्र कोठारी येथील डॉ. वामन बहात्ररे यांच्याशी चर्चा केली. परिसरातिल रुग्णांना होमकोरोन्टीन करण्यासाठी विलगीकरण कक्षाची जागा नियोजित करत असताना (1) सरस विद्यालय मांडवी व (2)सुधाकरराव नाईक निवासी कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय पळशी या जागेची पाहणी करण्यात आली. तसेच मांडवी येथिल शासकीय नेत्र रुग्णालयास भेट देऊन येथील डॉक्टरांची नतर विलगीकरण कक्षामध्ये ड्युटी लावण्यात संबंधित अधिकारी याना आदेश देण्यात आले.
पुढील काळात कोरोना विषाणू संसर्ग हा आजार ग्रामीण भागात पसरला व मांडवी आरोग्य केंद्र येथे जागा अपुरी पडली तर पर्यायी व्यवस्था म्हणून परिसरातील शाळा, वस्तीगृह, दवाखान्याची, पाहणी करण्यात आली. यावेळी पळशी येथील सुधाकरराव नाईक शाळेचा विचार करण्यात आला. कारण येथे वस्तीगृह व मोकळ्या मैदाने गावाच्या बाहेर आहे यामुळे येथे प्रत्यक्ष भेट देऊन साय्यक जिल्हाधिकारी मा.अभिनय गोयल साहेब यांनी स्वतः भेट देऊन या शाळेची पाहणी करण्यात आली (विलगीकरण कक्ष )उभारण्यासाठी लागणारे साहित्य व नियोजन याचे अहवाल तयार करून ताबडतोब पाठवायच्या आदेश देण्यात आले.

दरम्यान मांडवी परिसरातल्या अर्धवट अवस्थेत असलेले आरोग्य केंद्र व इमारती यांची पाहणी करताना पळशी येथे भेट देऊन अर्धवट इमारतीची पाहणी करून यांचे अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. परिसरातील पिंपळगाव येथील आरोग्य केंद्राचे अहवाल सादर करावे असे सांगण्यात आले. यावेळी मा.सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनय गोयल यांच्या समवेत किनवट तालुक्याचे तहसीलदार मा. डॉ. नरेंद्र देशमुख व तसेच मांडवी जिल्हा परिषदेचे सदस्य मा.मधुकर राठोड, मांडवी चे आरोग्य अधिकारी डॉ विक्रम राठोड ,प्राथमिक आरोग्य केंद्र कोठारी चे डॉ. वामन बहत्ररे, मांडवी पोलिस ठाणे चे सह पो नि संतोष केंद्रे ,पत्रकार संदेश पाटिल, इंद्रपाल कांबळे आदि उपस्थित होते.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Anand Bhalerao (Editor in Chief) 9421585350. सूचना -- या इंटरनेट न्युज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखा मधून व्यक्त झालेल्या मताशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही.