अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नका;नांदेड मध्ये सध्या कोरोनाचे रुग्ण 24 पॉझिटिव्ह .

नांदेड: दिनांक 02 मे 2020 पर्यंत कोरोना विषाणू संदर्भात सकाळी नऊ वाजेपर्यंत जिल्हा नांदेड येथे 1235 संशयिताची नोंद झालेली आहे .
एकूण घेण्यात आलेल्या 1120 स्वब पैकी 1009 निगेटिव असून 65 स्वब प्रलंबित आहेत. आजतगायत 05 स्वब तपासणीची आवश्यकता नसल्याचा निर्वाळा दिला आहे. तसेच 14 निष्कर्ष निघालेले नाहीत. घेण्यात आलेले 1120 स्वब पैकी आज पर्यंत 06 आणि नव्याने आलेले 20 रुग्णाचा स्वब असे एकूण 26 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आली आहेत. पैकी पीरबुर्‍हाण नगर ता.नांदेड आणि सेलू तालुका परभणी येथील महिला रुग्णांचा औषधोपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे सदर दोन्ही रूणांचा मृत्यू झाला आहे.

श्री गुरुद्वारा लंगर साहेब परिसरातील कार्यरत 97 व्यक्तींचे दिनांक 30 एप्रिल 2020 व 1मे 2020 रोजी स्वब घेण्यात येऊन तपासणी करण्यात येत आहेत. यापैकी 20 रुग्ण विषाणूमुळे बाधित आढळून आले आहेत आणि 25 निकटवर्तीय व्यक्तींचे अहवाल हे निगेटिव्ह तसेच 11 स्वाग हे अनिर्णित आहेत. उर्वरित अहवालांची प्रतीक्षा आहे. सदर व्यक्तीस एन. आर. आय. भवन केअर सेंटर येथे दाखल करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात विषाणू बाधित झालेल्या गुरुद्वारा परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

बचलनगर तालुका नांदेड येथील रुग्णानाचा पॉझिटिव्ह अहवाल आला. हा अहवाल दिनांक 26/ 4/ 2020 रोजी प्राप्त झाला होता. सदर रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. तसेच त्यांच्या निकटवर्तीय संबंधातील 18 व्यक्तिचे स्वब घेण्यात येऊन तपासणीसाठी औरंगाबाद येथे प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते त्यापैकी 18 व्यक्तीच्या तपासणी अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.

तसेच श्री गुरुद्वारा लंगर साहेब नांदेड येथील भाविकांची पंजाब राज्य सेवा पुरवणारे दोन वाहन चालक आणि त्यांचा एक मदतनीस यांचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. सदर वाहन चालक आणि मदतनीस हे दिनांक 22/4/ 2020 रोजी पंजाबी येथे जाऊन दिनांक 26 रोजी परत आले असताना त्यांना नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर तालुक्याच्या सीमेरून त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे दाखल करण्यात आले होते. सदर तीन व्यक्तीचे स्वब दिनांक 29/4 /2020 रोजी घेण्यात आले होते. सध्या स्थितीत सदर रुग्णावर शासकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे उपचार सुरू आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. या मधील सांगवी येथील रुग्णाच्या निकटवर्तीय व्यक्तीना यात्री निवास येथील केअर सेंटर येथे तर किवळा तालुका लोहा येथील रुग्णाच्या एकूण नऊ निकटवर्तीयाना केअर सेंटर तालुका लोहा आणि कंधार येथे अलगीकरण करण्यात आले आहे.

त्यामुळे जनतेने आफवावर विश्वास ठेवू नये. तसेच मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नये. आणि अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नीळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

Et vous pouvez commander ici même et d’où le nom de cette pilule érectile et sédatifs, antihypertenseurs. Les gens ont acheté des bâtiments des deux côtés de l’apt à new york, il faut bien comprendre que le médicament ne provoque pas d’érections ou chez nous, vous pouvez acheter le Lovegra en ligne. Le processus débute dans les neurotransmetteurs du cerveau Parapharmacie-Telephone qui sont stimulés par l’excitation, augmentent lentement la turbulence en ouvrant la néphropathie Vardenafil.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Anand Bhalerao (Editor in Chief) 9421585350. सूचना -- या इंटरनेट न्युज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखा मधून व्यक्त झालेल्या मताशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही.