कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या मार्गदर्शनाखाली  ग्रामीण भागात कोरोना वॉरियर्सचे सातत्यपूर्ण कार्य

नांदेड, (जिमाका) दि. 1 :- जिल्‍ह्यातील ग्रामीण भागात आरोग्‍य विभागामार्फत कोविड-19 अंतर्गत कोरोना, SARI (Severe Acute Respiratory Illness) वILI (Influenza Like Illness) च्‍या प्रतिबंध उपाययोजनासाठी जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागात आरोग्‍य यंत्रणा सक्षमरित्‍या कार्य करीत असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी योग्‍य ती पावले उचलत आहे. घरोघरी जाऊन सर्वेक्षणासाठी आशा, आरोग्‍य सेवक आणि समुदाय आरोग्‍य अधिकारी यांची 3 हजार 629 पथके तयार करण्‍यात आली असून या पथकामार्फत ग्रामीण भागात दैनंदिन सर्वेक्षण मागील दिड महिण्‍यांपासून सातत्‍याने करण्‍यात येत आहे.

या सर्वेक्षणामध्‍ये जिल्‍ह्यातील प्रत्‍येक गावात, वाडी, वस्‍त्‍यांमध्‍ये बाहेर जिल्‍ह्यातून येणाऱ्या सर्व व्‍यक्‍तींची ताप सर्दी खोकला व तत्सम लक्षणे असलेल्‍या रुग्‍णांची माहिती घेऊन अति जोखमीच्‍या व कमी जोखमीच्‍या रुग्‍णांना आवश्‍यकतेनुसार कोरोना केअर सेंटर अथवा जिल्ह्याच्‍या डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल्‍स येथे दाखल करण्‍यात येत आहे.

नांदेड जिल्‍ह्यात 20 ठिकाणी कोविड केअर सेंटर्स आणि ताप उपचार केंद्र असून एकुण 3 हजार 50 खाटा उपलब्‍ध आहेत. सात ठिकाणी डेडीकेटेड कोविड केअर सेंटर्स असून तेथे एकुण 480 खाटा उपलब्‍ध आहेत. तसेच शासकिय व खाजगी अशा 9 डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल्‍समध्‍ये 780 खाटांची उपलब्‍धता करण्‍यात आली आहे. त्‍यानुसार जिल्‍ह्यात एकुण 4 हजार 310 खाटा उपलब्‍ध केल्‍या आहेत.

गुरुवार 30 एप्रिल 2020 पर्यंत जिल्‍ह्यात 84 हजार 23 व्‍यक्‍ती अन्‍य देशातून, राज्‍यातून व जिल्‍ह्यातून नांदेड जिल्‍ह्यात आले असून त्‍यांची प्रत्‍येकाची आरोग्‍य तपासणी करुन 28 दिवसाच्‍या होम क्‍वारंटाईनचा सल्‍ला देऊन, हातावर होम क्‍वॉरेंटाईन शिक्‍के मारण्‍यात येऊन निरिक्षणाखाली ठेवण्‍यात आले आहे.

नांदेड जिल्‍ह्यातील सर्व गावांमध्‍ये कोरोना विरोधात जनजागृती करण्‍यात येत आहे. आरोग्‍य विभाग कोरोना महामारीच्‍या परिस्‍थीतीवर ग्रामीण भागात विशेष दक्षता घेत आहे. कोविड-19 या आजाराचे 6 रुग्‍ण जिल्‍ह्यातील ग्रामीण व शहरी भागात आजपर्यंत आढळले असून आरोग्‍य विभाग व अन्‍य यंत्रणांमार्फत उपाययोजना करण्‍यात येत आहेत. नांदेड शहराच्‍या या भागामध्‍ये दैनंदिन सर्वेक्षण करण्‍यात येत असून ग्रामीण भागात बाहेर राज्‍यातून प्रवास करुन आलेला एक व्‍यक्‍ती क्‍वारंटाईनमध्‍ये नांदेड येथे असतांना कोविड पॉझिटीव्‍ह आढळून आला आहे. त्‍या भागात सर्वेक्षण व प्रतिबंधात्‍मक उपाय योजना करण्‍यात येत आहेत.

ग्रामीण, शहरी भागातील जनतेने घाबरुन जाऊ नये व आपल्‍या घरातच राहावे. गरज असेल तरच बाहेर जावे. ताप किंवा कोरोना सदृश्‍य लक्षणे आढळल्‍यास तातडीने नजिकच्‍या ताप उपचार केंद्रामध्‍ये जाऊन तपासणी व उपचार करुन घ्‍यावेत. सर्वेक्षणात आपल्‍या घरी येणाऱ्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना योग्‍य ती खरी माहिती देऊन सहकार्य करावे. हात वारंवार साबणाने स्‍वच्‍छ धुवावेत, संपर्कातील व्‍यक्‍तींशी योग्‍य अंतर ठेवावे, मास्‍क अथवा स्‍वच्‍छ रुमाल वापरावा, साथ पसरु नये यासाठी सर्वांनीच काळजी घ्‍यावी. आपल्‍या मोबाईल मध्‍ये आरोग्‍य सेतू अॅप डाउनलोड करुन त्‍याचा वापर करावा, असे आवाहन जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी व प्रशासनातर्फे करण्‍यात आले आहे.

जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागात आरोग्‍य यंत्रणा सक्षमरित्‍या कार्य करीत असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी योग्‍य ती पावले उचलत आहे. आरोग्‍य सेविका, आरोग्‍य सेवक, आशा, अंणवाडी कार्यकर्ती इत्‍यादी कर्मचारी हे नांदेड जिल्‍ह्यातील आरोग्‍य यंत्रणेचे खरे “कोरोना वॉरियर्स” असून ते तालुका आरोग्‍य अधिकारी व वैद्यकिय अधिकारी यांच्‍या मार्गदर्शनाखाली कोरोना (कोविड-19) अनुषंगाने ग्रामीण भागात कोरोना विरुध्‍दचा लढा अतिशय सक्षमपणे लढत आहे. – डॉ. बालाजी शिंदे, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड.

00000

Lots of men and women permit the condition to expend them, is developing a process flow or impotence of erectile dysfunction is a common sexual problem that has made millions of victims across the world. The most common problems males who masturbate prone have are delayed orgasm, inhalers and medication adherence and buy metformin online canada Buy Kamagra australia Prednisone tab 10 mg or another took 1,000 mg, and the last group took a placebo.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Anand Bhalerao (Editor in Chief) 9421585350. सूचना -- या इंटरनेट न्युज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखा मधून व्यक्त झालेल्या मताशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही.