kinwat today news

महाराष्ट्र दिनानिमित्ताने पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात ध्वजारोहण संपन्न

नांदेड, (जिमाका) दि. 1 :- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण आज संपन्न झाला.

कोरोना विषाणुंच्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या निर्देशांचे पालन करुन अत्यंत साधेपणाने हा सोहळा साजरा करण्यात आला.

याप्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

00000

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply