kinwat today news

अडकलेल्या व्यक्तींना त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी व येण्यासाठी लागणाऱ्या परवानगीची माहिती ऑनलाईन भरण्याचे आवाहन

नांदेड, (जिमाका) दि. 1 :- लॉकाडाऊनमुळे नांदेड जिल्ह्यात अडकलेल्या व्यक्तींना परत त्यांच्या मुळगावी जाण्यासाठी तसेच नांदेड जिल्ह्यातील इतरत्र अडकलेल्या व्यक्तींना परत आपल्या मुळगावी येण्यासाठी लागणाऱ्या परवानगीची आवश्यक ती माहिती ऑनलाईन पद्धतीने पुढील दिलेल्या लिंकवर भरावी, असे आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाने केले आहे.

नांदेड जिल्ह्यात विविध ठिकाणी अडकलेल्या व्यक्तींना आपल्या मूळ गावी परत जाण्यासाठी परवानगी हवी असल्यास पुढील लिंकवर क्लिक करून आवश्यक ती माहिती भरावी. https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSf6WqrggEuZOxh2bdjdOdMDC0Ix47ByWxQ0_9hJO2sGbUoT3w/viewform?usp=sf_link

तसेच भारताच्या व महाराष्ट्रराज्याच्या विविध भागात अडकलेल्या व्यक्तींना नांदेड जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी परत येण्यासाठी परवानगी हवी असल्यास पुढील लिंकवर क्लिक करुन आवश्यक ती माहिती भरावी.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSf6WqrggEuZOxh2bdjdOdMDC0Ix47ByWxQ0_9hJO2sGbUoT3w/viewform
बंधितांनी सदर माहिती भरल्यानंतर संबंधित जिल्हा, राज्यातील सक्षम प्राधिकारी यांच्याशी समन्वय साधून नांदेड जिल्हा प्रशासनाकडून पुढील योग्य ती कार्यवाही केली जाईल. त्यामुळे आपल्या गरजेनुसार वरीलपैकी लिंकवर आवश्यक माहिती भरून नांदेड जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 02462-249279, 02462- 235077 ईमेल collectornanded1@gmail.com संपर्क करा, असे आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांनी केले आहे.

00000

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply