kinwat today news

क्रांतीवीर लहुजी साळवे कर्मचारी महासंघातर्फे “मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड 19” ला 51 हजारची मदत

नांदेड, (जिमाका) दि. 1 :- कोरोनाचा उपचारासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद म्हणून जिल्ह्यातील विविध दानशूर व्यक्ती, संस्था भरभरुन मदत “मुख्यमंत्री सहायता निधी कोविड19” साठी करीत आहेत. या पार्श्वभूमीवर क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ (लसाकम) महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड 19 साठी 51 हजार रुपयाचा धनादेश तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे आज जिल्हाधिकारी कार्यालयात सुपूर्द केला.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, “लसाकम”चे महासचिव गुणवंत काळे, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक शिवा कांबळे, गटशिक्षणाधिकारी गंगाधर सोनटक्के, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत मेकाले, सचिव डॉ. अशोक झुंजारे आदींची उपस्थिती होती.

00000

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply