kinwat today news

“लसाकम” जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने गरजू गरीब पंचावन्न कुटुंबांना अन्नधान्य कीटचे वाटप.

नांदेड प्रतिनिधी।। क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ “लसाकम ” जिल्हा शाखा नांदेड च्या एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या निमित्ताने पांडुरंग नगर, गांधीनगर, बालाजीनगर, शिवनगर आणि विठ्ठल नगर आदी नगरातील पंचावन्न (५५) गरजू व गरीब कुटुंब व कामगारांना कामगार दिनाच्यानिमित्ताने अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले.
प्रारंभी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्यानिमित्ताने साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले. गांधी नगर,नांदेड येथे आज रोजी सकाळी सात ते साडेआठवाजेपर्यंत या किटचे वाटप करण्यात आले. त्या किटमध्ये “लसाकम ” जिल्हा शाखेच्याच्या वतीने तांदूळ, गहू,गोड तेल, तुरदाळ, साखर, साबण, मिरची पावडर, हळद पावडर, चहा पत्ती, टूथपेस्ट, एम.जी.डी.दिनदर्शिका आणि विस्तार अधिकारी पी.बी.मळगे यांच्या वतीने मास्क आदी संसार उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे , प्रदेश महासचिव गुणवंत काळे गटशिक्षणाधिकारी गंगाधर सोनटक्के,राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक शिवा कांबळे, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत मेकाले, जिल्हा सचिव डॉ.अशोक झुंजारे, विस्तार अधिकारी पी.बी.मळगे, कार्याध्यक्ष जयप्रकाश वाघमारे,जिल्हा कोषाध्यक्ष शंकर नामवाड,लसाकम चे मार्गदर्शक विठ्ठलराव आंबटवार,रमेशराव कलगोटवार,लसाकम चे कार्यकर्ते उत्तम बाभळे,गंगाधर मेहत्रे, विकास अधिकारी मारुती वाघमारे आदींची उपस्थिती होती.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply