kinwat today news

कंटेंटमेंट झोन म्हणून घोषित करावा लागल्यास प्रतिबंधित क्षेत्रा करिता पूर्व तयारी आराखडा बैठक

।।किनवट टुडे न्युज।। – सध्या देशभरात कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव वाढत चाललेला दिसून येत आहे. त्याच बरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.किनवट शहरा लगत असलेल्या विदर्भ व तेलंगाणा राज्यच्या सीमे लगतच्या भागामध्ये कोरोना विषाणू बाधित रुग्ण संख्या बऱ्याच मोठ्या प्रमाणात आढळून आलेली आहे, त्यामुळे बाधित रुग्णापासून किनवट शहरातील नागरिकांना या विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिबंधनात्मक उपाययोजना करने गरजेचे आहे. भविष्यात सीमे लगतच्या बाधित रुग्णा कडून शहरातील नागरिकांना बाधा झाल्यास बाधित व्यक्ती ज्या परिसरात राहतात तो परिसर प्रतिबंधित क्षेत्र(कंटेंटमेंट झोन) म्हणून घोषित करावा लागत असून तो परिसर पुर्णतः सील करावा लागणार आहे. अशा परिस्थिती मध्ये त्या परिसरातील नागरिकांना त्यांना लागणारी जीवनावश्यक सेवा सुविधा जसे अन्न धान्य, दूध, किराणा,औषधी व पाणी त्यांना त्यांच्या त्यांच्या राहते घरी उपलब्ध करून देणे आवश्यक ठरते. याबाबत वेळोवेळी मा. आमदार भीमरावजी केराम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्या कामी पूर्व उपयोजना करने साठी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार,व्यापारी संघटना अध्यक्ष व मा नगराध्यक्ष श्री दिनकर चाडावर , व्यापारी संघटना उपाध्यक्ष फेरोज भाई ,न.पालिका मुख्याधिकारी सुंकेवाड आदींची बैठक पार पडली.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply