kinwat today news

दुःखद बातमी; शे. मन्नान अब्दुल करीम सर यांचे हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन.

किनवट प्रतिनिधी :(29एप्रिल)इलेक्ट्रॉनिक प्रेस मीडियाचे ता.प्रसिद्धी प्रमुख व सी24 चे जिल्हाप्रतिनिधी पत्रकार शे.मझर रा.सारखानी यांचे वडील मा. शे. मन्नान अब्दुल करीम सर यांचे आज सकाळी 8 वाजता सारखानी येथे त्यांच्या निवास्थानी ह्रदयविकाराच्या तीव्र धक्याने निधन झाले आहे.
ते उमरी( बा) ता. किनवट येथील सरस्वती विद्यालयात शिक्षक या पदावर कार्यरत होते. अतिशय शिस्तप्रिय शांत, स्वभावाचे असलेले व्यक्तीमहत्व आज आपल्यातून निघून गेल्याने परिसरात, हळहळ व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे सध्या सुरु असलेल्या पवित्र रमजान महिण्यातील त्यांना उपास सुरु होता. काळाने यातच त्यांच्यावर घात केल्याने त्याच्या परिवारावर अतिशय दुःख ओढावले आहे. या दुःखात शे. मझर व त्यांच्या परिवारा सोबत आपन सर्व सहभागी आहोत. यातून लवकरात लवकर या परिवारास सावरन्याची ईश्वर शक्ति देवो ! आपन सर्व या प्रसंगी प्रार्थना करू…..
किनवट टुडे न्युज परिवार व इलेक्ट्रॉनिक प्रेस मीडिया तर्फे श्रद्धांजली!

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply