kinwat today news

आंदेगाव येथील आगीत लाखोंचे नुकसान- आ.जवळगावकर यांची तात्काळ भेट –

हिमायतनगर प्रतिनिधी/— 
तालुक्यातील आंदेगाव येथे दि.28 एप्रील रोजी मंगळवारी रात्री 12 वाजेच्या दरम्यान घरांना आग लागली सदरील आगेचा मोठ्या प्रमाणात भडका असल्यामुळे या आगडोबांत नऊ घरे भस्मसात होऊन घरातील अन्नधान्यासह संसराउपयोगी साहित्य जळून खाक झाले असल्यामुळे दहा कुटुबिंय उघड्यावर आले असुन सदरील घटनेत 31 लाखांचे नुकसान झाले आहे.
       हिमायतनगर शहरा पासुन 7 कि.मी.अंतरावर असलेल्या आंदेगाव येथे मंगळवारी रात्री नऊ घरांना भयानव आग लागली होती.या आगीत जवळपास दहा कुटुबिंयाचे नऊ घरे भस्मसात झाली आहेत.घरातील वर्षभराचे राशन अन्नधान्य यासह शेतकर्यांच्या शेतातील माल जळून खाक झाला आहे.
कोरोनाच्या लाॅकडाऊन मध्ये अगोदरच अनेक व्यवहार बंद असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असुन यात अन्नधान्याचे टंचाई भासत असतांना आंदेगाव येथील दहा कुटुबिंयाची घरे जळून मोठी हानी झाली आहे.

यामुळे दहा घरातील कुटुबिंय आज उघड्यावर आले असुन या कटुबियांना मदतीची गरज आहे.
   सदरील आग विझविण्यासाठी नगरपंचायत च्या अग्निशमन दलास घटनेची माहिती दिली. परंतू येथील अग्निशामक च्या गाडी सेल्फ उचलत नसल्याचा बहाना केला गेला त्यामुळे हि आग भडकत गेली परंतू अग्निशमन ची गाडी आली नाही तदनंतर भोकर नं.पं.अग्निशामक गाडी पाचारण केली असता सदरील गाडी तिन तास उशिरा आली होती.
 तोपर्यंत 9 घरे जळून खाक झाली होती. हिमायतनगर नं.पं.चे अग्निशामक त्वरीत आले असते तर आग आटोक्यात ऐत होती अशी माहिती सरपंच यांनी दिली.
 बुधवारी सकाळी घटनास्थळी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी भेट देऊन घरे जळालेल्या कुटुबिंयाना धिर दिला या बरोबरच तलाठी चव्हाण,मंडळाधिकारी कंदारे ,ग्रामसेवक पोपुलवाड यांनी पंचनामा केला असता यात  31 लाख रूपयांचे आगीत नुकसान झाले असल्याचे सांगितले आहे. घटस्थळास आ.माधवराव पाटील जवळगावकर ,सुभाष राठोड,सरपंच दत्ता गटकपवाड ,जमादार चोले यांनी पाहणी केली आहे.
 
   

        

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply