kinwat today news

नगर परिषद,भोकर ने सर्व पत्रकारांचा प्रशस्तीपत्र देऊन केला सन्मान !

भोकर नगर परिषदेच्या वतीने भोकर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संपादक उत्तम बाबळे आणि सर्व पदाधिकारी पत्रकार बांधवांचा प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आला सन्मान!

किनवट टुडे न्युज : कोरोना सारख्या महाभयंकर संसर्गजन्य रोगावर आळा घालण्यासाठी विविध यंत्रणा आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहेत.त्याच प्रमाणे पत्रकार बांधव ही कर्तव्य बजावत आहेत.या निस्वार्थ कार्याची दखल घेऊन आज दि.२८ एप्रिल रोजी भोकर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी सौ.प्रियांका टोंगे यांनी भोकर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा अंबुज प्रहार न्युज लाईव्हचे संपादक उत्तम बाबळे,सचिव सिद्धार्थ जाधव,गंगाधर पडवळे,शेख लतिफ भाई,संदेश कांबळे, सौ.स्वरुपा भोसले,राहूल कदम,शेख फईम भाई,चंद्रकांत बाबळे,शेख शहारुख,निळकंठ पडवळे,शे.सुजावोद्दीन, रवि राठोड यासह आदींचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला व भावी सत्कार्यास शुभेच्छा दिल्या.यावेळी नगराध्यक्षांचे प्रतिनिधी विनोद पाटील चिंचाळकर,संतोष मारकवार,न. प.चे जावेद इनामदार यासह आदींची उपस्थिती होती.
पत्रकार संघातील उर्वरीत सर्व पदाधिकारी व सदस्यांचा देखील प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
यापुर्वी भोकर जिल्हा व अतिरीक्त सत्र न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश मा.मुजीब एस.शेख यांनी भोकर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा अंबुज प्रहार न्युज लाईव्हचे संपादक उत्तम बाबळे यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला होता. आणि आज नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रियंका टोंगे यांनी पत्रकारांचा सन्मान केला.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply