kinwat today news

साईबाबा संस्थान च्या वतीने किनवट शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांना धान्याच्या किट चे वाटप

किनवट टुडे न्यूज:(26) किनवट येथील श्री साईबाबा संस्थान च्या वतीने किनवट शहरातील वृत्तपत्र विक्रेते यांना मंदिराच्या सभागृहात धान्याचे किट वाटप करण्यात आले.
सामाजिक दायित्वाच्या भावनेतून पुढाकार घेऊन आपत्कालीन परिस्थितीमध्ये अडकलेल्या वृत्तपत्र विक्रेते यांच्या घरोघरी जाऊन अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी किनवटचे उपविभागिय पोलीस अधिकारी श्री मंदार नाईक, माजी नगराध्यक्ष साजिदखान, दिनकर चाडावार, किशनराव किनवटकर, के मूर्ती, पत्रकार प्रदीप वाकोडीकर, गोकुळ भवरे, प्रमोद पोहरकर, आशिष देशपांडे, किशन भोयर, किरण किनवटकर, प्राध्यापक सुनील व्यवहारे, उत्तम कानिंदे, साईबाबा संस्थान चे संचालक पवार स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साईबाबासंस्थानच्या वतीने गेल्या महिना भरापासून 225 नागरिकांना मोफत धान्य किटचे वाटप व अन्नदानाचे कार्य नित्य सुरू आहे या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply