kinwat today news

या वर्षी कोवीड १९ च्या संक्रमनाचा काळ असल्याने तेंदूपान संकलन केंद्र चालु राहणार की नाही, याबद्दल वनविभाग गोंधळावस्थेत

किनवट/प्रतिनिधी— महाराष्ट्र दिनापासून तेंदूपानांचा हंगाम सुरु होत असतो. पेनगंगा अभयारण्य झोनमध्धे किनवट तालुक्याचे कांही क्षेत्र येत असल्याने कांही तेंदूपाने संकलन केंद्र बंद करण्यात आलीत. अभयारण्यातील तेँदूपानाची हमखास तस्करी केली जाते, ती रोखवण्याचे प्रशासनासमोर एक मोठे आव्हान आहे. दरवर्षीच तेंदूपाने विकणा-या मजुरांच्या बोनस रक्कमेत संकलन केंद्रचालक व वनविभागातील कांही शुक्राचार्यांच्या संगनमतातून बोगस नावे नोंदऊन भ्रष्टाचार केला जातो तो आता थांबला पाहिजे, असे अन्यायग्रस्त मजुरांनी मागणी केली आहे.
वनउपजातून सरकारला भरमसाठ राजस्व मिळते. डींक, मोहफूल, तेंदूपाने अशा विविध नैसर्गीक स्त्रोतांमुळे शासन तिजोरीत राजस्वाच्या रुपाने भर पडत असते. डींक ठेकेदार आणि वनविभाग यांच्या दिलजमाईतून शासनाला प्रत्यक्ष किती महसूल मिळत असेल ? यावर प्रश्नचिन्हच आहे. मोहफूलं हंगाम हा मार्च ते एप्रिल दरम्यान असतो. जंगलात जाऊन मोहफूलं गोळा करण्यापुर्वी झाडाखालचा पालापाचोळा जाळून टाकतात. त्यातून जंगलाला आग लागल्या जाण्याची शक्यता असल्यामुळे वनविभागाने जाळरेषा आज नको तर तत्पुर्वीच म्हणजे फेब्रुवारी ते मार्चमध्धेच तयार करायला हव्यात मात्र तसे कांही दिसत नाही. आज त्याचा उदोउदो करुन घेतांना दिसतात.
१ मे या महाराष्ट्र दिनापासून तेंदूपानाचा हंगाम सुरु होत असतो. या वर्षी कोवीड १९ च्या संक्रमनाचा काळ असल्याने तेंदूपान संकलन केंद्र चालु राहणार की नाही, याबद्दल वनविभाग गोंधळावस्थेत दिसून येत आहे. मात्र या वनउपजातून ग्रामिण लोकांच्या हाताला कामही मिळेल आणि लाॅकडाऊनच्या काळात कोणावर अवलंबून राहणार नाहीत. रोजगार हमी योजने अंतर्गत हा तेंदूपत्ता संकलन करण्यात येत असतो. त्यामुळे प्रसिद्धीला हापापलेल्यांच्या दात्यांना चपराकही मिळते. वनविभाग, वनविकास महामंडळ, सामाजिक वनिकरण व शेतीशिवारातून ही तेंदूपाने तोडली जातात. संकलन केंद्रचालकावर वनविभागाचे नियंत्रण असणे आवश्यक आहे. दैनंदिन तेंदूपाने खरेदी करीत असतांना ज्या मजुरांनी तेंदूपान त्या केंद्रावर विक्री केली त्यांचीच नावे नांद करावीत. केंद्रचालकावर विश्वासून न राहता वनविभागाच्या वनरक्षक व वनपालांकडेसुद्धा ही जबाबदारी सोपवण्यात यावी. एवढेच नव्हेतर प्रसंगी व्हीडीओ चित्रीकरण करण्याची व्यवस्था केल्यास पारदर्शकता येईल आणि अन्यायसुद्धा होणार नाही.
पैनगंगा अभयारण्य तथा वन्यजीव खरबी व कोरटा कार्यालयाने अभयारण्यातील तेंदूपत्ता तोड होणार नाही याबद्धल आजच सावध व्हावे लागेल. अभयारण्यातील तेंदूपत्ता हा दरवर्षीच किनवट तालुक्यात तस्करी मार्गाने मोठ्या प्रमाणात लांबवला जातो. तेंदूपत्ता तोड करीत असतांना झाडांची मोडतोड केली जाते हे नुकसान टाळण्यासाठी वन्यजीव विभागाने सतर्क होऊन तेंदूपत्ता तोड होणार नाही याची सावधता बाळगणे पर्यावरणाच्या दृष्टीने आवश्यक आहे. अभयारण्यातील तेंदूपाने किनवट तालुक्यासह तेलंगाणा राज्यातही तस्करी मार्गाने लांबवला जातो. शेकडो मजूर अभयारण्यातून तेंदूपत्ता तोड करतात. मग वन्यजीव विभागाचे त्या त्या क्षेत्रातील वनरक्षक, वनपाल हे काय करतात ? तस्करी रोखवण्यास अयशस्वी ठरत असतील तर तस्करीस मूकसंमत्ती असु शकते, असाच त्याचा मतीतार्थ निघतो. खरेतर जो ठेकेदार युनिट खरेदी करतो, त्याच वनपरिक्षेत्रातील तेंदूपत्यांचे (टार्गेट) लक्ष रेखांकीत केलेले असते, तेवढ्याचाच मामूल भरणा करतात. परंतु लक्ष अपूर्ण असल्याची सबब पुढे करुन लगतच्या अभयारण्यातील तेंदूपत्ता तस्करी मार्गाने खरेदी करुन परस्पर रेकार्डवर न घेता लांबवतात. हा प्रकार वनविभागाने थांबवला पाहिजे. मधल्या काळात जल, जंगलचे मूळ हक्कदार आदिवासी असून, त्यांनीच तेंदूपाने खरेदी व विक्री करावेत असा आवाज समोर आला होता. परंतु त्यावर पडदासुद्धा पडला हे विशेष.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply