kinwat today news

लॉकडाउन काळात विना परवानगी अवैध वाहतूक करीत असताना पकडला सागवान सोफा व पलंग

किनवट टुडे न्युज: दिनांक 25/एप्रिल/2020 रोजी रात्री 11:30 वा.वनपरिक्षेत्र – किनवट अंतर्गत नियतक्षेत्र – चिखली मधील कक्ष क्र.197A सागी थूट 03 घ.मी. 0.567 किंमत-17939 नग क.सा.1घ.मी .0.0499 माल किमंत 3108/- इतका माल जप्त करण्यातआला.व आरोपी नामे 1)शेख हसन शे.नजू यास पकडण्यात यश मिळाले तर नामे 1)शेख हैदर शे. रमजान 2)शेख इम्रान शे. हुसेन हे फरार आहेत. वरील सर्व आरोपी राहणार चिखली येथील रहिवासी आहेत.
तर दिनांक 26/एप्रिल/2020 रोजी रात्री 12:30 वा.वनपरिक्षेत्र – किनवट अंतर्गत नियतक्षेत्र – दिगडी (मंग) मधील बेंदीतांडा येथे विना नंबर चा काळ्या पिवळ्या रंगाचा एक आटो सागवाण तयार फर्निचर सोफा व पलंग विना परवानगी अवैध वाहतूक करीत असताना पकडला साग कटसाईज नग 100 घ.मी .0.2903 माल किमंत 18082/- इतका माल जप्त करण्यातआला.व आटो किंमत 50000 असा मिळून 68082 एवढा ऐवज जप्त केला. आरोपी अंधारात फरार झाले.
यात वनपरिक्षेञ अधिकारी खंदारे , वनपरिमंडळ अधिकारी के.जी. गायकवाड, साहेब,संतवाले,शहाजी डोईफोडे, वनरक्षक संभाजी घोरबांड, अरुण चुकलवर, साईदास पवार,रवी दांडेगावकर,अनिल फोल्ले, मुळे, कापसे, घायाळ, वाहन चालक बि. व्ही. आवले, बी. टी.भुतनर, दांडेगावकर वनमजूर भावसिंग जाधव यांचा सहभाग होता.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply