kinwat today news

वसमत येथे वेदांताचार्य श्री ष. ब्र. १०८ दिगंबर शिवाचार्य महाराज व हेमंत पाटील यांच्या हस्ते अन्नपूर्णा धान्य किट,100 बॉटल सॅनिटायजरचे वाटप

किनवट टुडे न्युज- आज वसमत येथे वेदांताचार्य श्री ष. ब्र. १०८ दिगंबर शिवाचार्य महाराज व हेमंत पाटील यांच्या हस्ते अन्नपूर्णा धान्य किट,100 बॉटल सॅनिटायजर वाटपकरण्यात आले.
सिताराम म्यानेवर मित्र मंडळ आयोजित लिंगायत समाज बांधवांना शिवलिंग शिवाचार्य महाराज थोरला मठ मठाधिपती वेदांताचार्य श्री ष. ब्र. १०८ दिगंबर शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते यांच्या हस्ते कोरोना या विषाणूजन्य आजाराला लढा देत असताना हाताला काम नसणाऱ्या बांधवांसाठी अन्नपूर्णा धान्य किट,100 बॉटल सॅनिटायजर वाटप खासदार हेमंतभाऊ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे. तसेच नगर परिषद कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी व पोलीस बांधव यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने निर्जंतुकरण करण्यासाठी सेंसर युक्त वार रम तयार करण्यात आली या मशीनमध्ये कमी प्रमाणात औषधी वापरून जास्त लोकांना निर्जंतुक करण्याची प्रणाली वापरली आहे काल वार रूमला भेट दिली व स्वच्छता कर्मचारी यांना सॅनिटायझर बॉटतले वाटप करण्यात आले.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनीलभाऊ काळे, वसमत नगरअध्यक्ष श्रीनिवास पोराजवार उपनगराध्यक्ष सिताराम म्यानेवर,जि.प.सदस्य राजू चापके, शहर प्रमुख बाबा अफूने, नगरसेवक शिवाजी अलडिंगे, स्वामी,ऍड.रंगनाथ देशमुख, श्याम वाघमारे, किरण दुमनाने, विशाल कडतन, राजू बरगळ,गोविंद जलेवार, माधव लाकमवार, तुषार काटकर, आदी उपस्थित होते.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply