kinwat today news

महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त सेवानिवृत्त कर्मचारी रमाकांत भंडारे यांचे कडून गरजूंना मदत

किनवट टुडे न्युज – (तालुका प्रतिनिधी) जगतज्योती महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त तालुक्यातील बेंदी येथील साहेबराव बुरकुले यांच्या मुलींच्या शिक्षणाकरिता अकराशे रुपये मदत महसूल विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी रमाकांत भंडारे यांचे तर्फे देण्यात आली. सदर मदत नगराध्यक्ष आनंद मच्चेवार, प्राचार्य शिंदे सर राघूमामा यांचे हस्ते देण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की, गेल्या अनेक वर्षापासून किनवट येथील मूळ रहीवासी असलेले सेवानिवृत्त कर्मचारी रमाकांत भंडारे सध्या ते नांदेड येथे वास्तव्यास असून आपल्या निवृत्त वेतनातून दर महिन्याला एका गरजू व्यक्तींच्या मुलांच्या शिक्षणाकरीता अकराशे रुपयाची मदत करत असतात, दिनांक 26 रोजी महात्मा बसवेश्वर जयंतीचे औचित्य साधून सदर मदत कोरोना विषाणुच्या महामारी पासून बचावा करिता सोशल डिस्टन्स पाळून देण्यात आली. त्यावेळी नगराध्यक्ष आनंद मच्चेवार, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती राघु मामा, बळीराम पाटील महाविद्यालयाचे माजी प्राचार्य शिंदे सर, भाजपाचे माजी शहराध्यक्ष सतीश बिराजदार, तालुका मराठी पत्रकार परिषदेचे तालुका अध्यक्ष अनिल भंडारे, साप्ताहिक वंजारी पुकार चे संपादक दत्ता जायभाये, वड्डे आप्पा, आनंद सोनटक्के, प्राध्यापक कारामुंगे सर, संजय बिराजदार, चंद्रकांत भंडारे, सतिष बिराजदार, सागर शिवणकर इत्यादी हजर होते.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply