kinwat today news

हेमंत पाटील यांच्या हस्ते महागाव येथे गरजुना धान्य किट चे वाटप तर हदगाव येथे पोलीस मित्रांना अंगुर वाटप

किनवट टुडे न्युज- (ता.24) आज हिंगोली चे खासदार हेमंत भाऊ पाटील यांनी महागाव व हादगाव या तालुक्याचा दौरा करून येथील प्रशासनास योग्य ते मार्गदर्शन करत अनेक ठिकाणी खाना धान्याची वाटप करण्यात आले.
महागाव शहरामधील झोपडपट्टी मधील गरजूंना धान्य किटचे वाटप करण्यात आले.
या वेळी त्या भागाचे नगरसेवक राजू राठोड,तालुका प्रमुख शाखा भरावडे, आदी मान्यवर उपस्थित होते. तर हदगाव येथे
उन्हातान्हात कर्तव्य बजावत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना खासदार हेमंतभाऊ पाटील यांच्या हस्ते आज द्राक्षाचे वाटप करण्यात आले.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply