kinwat today news

लसाकम ‘ लातूरच्या वतीने अन्नधान्याच्या किट चे वाटप

किनवट टुडे न्युज(लातूर) — कोरोना या विषाणूने सर्वत्र हैदोस घातला असून संपूर्ण देशात आणि राज्यात लॉकडाऊन असल्याने गरीबांच्या हाताला काम नसल्यामुळे अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. यासाठी सरकारने मोफत राशन पुरवठा करण्याची मोहिम उघडली आहे. परंतु कांही उपेक्षित वर्गापर्यंत ही योजना पोहोचण्यात अडचणी येत आहेत. अशा अडचणीत असलेल्या कुटुंबीयाचा शोध घेऊन त्यांना अन्नधान्य आणि किराणा साहित्याचे कीट वाटण्याचा उपक्रम लातूर येथील क्रांतीवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ (लसाकम ) या संघटनेने राबविला आहे.
आत्तापर्यत 1000/- रूपये किंमतीचे 35 कीट वाटप करण्यात आले असून या किटमध्ये ज्वारी,
गहू, तांदूळ , दाळ, तेल, साखर, चहापत्ती, मीठ आणि हळद असे साहित्य असून वाटप करताना कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे पालन करण्यात आले आहे.
या साहित्याचे वाटप करताना कोणत्याही प्रस्थापित राजकीय पक्षात काम करीत नसलेल्या पण परिवर्तनवादी चळवळीत सक्रीय असणाऱ्या कार्यकर्त्याना प्राधान्यक्रम देण्यात आला आहे. तसेच विधवा आणि निराधार महिलांनाही कीट देण्यात आले. यावेळी ‘ लसाकम ‘ चे संस्थापक नरसिंग घोडके, महासचिव राजकुमार नामवाड, लातूर जिल्ह्याचे अध्यक्ष विलास जाधव, शिरिष दिवेकर आणि नारायण कांबळे उपस्थित होते.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply