किनवट: युवा विकास सोसायटी द्वारा राजुरेश्वर स्किल डेव्हलपमेंट सेंटर कडून मास्कचे मोफत वाटप.

किनवट टुडे न्यूज: (22एप्रिल)

सध्या कोरोना व्हायरस संसर्गजन्य रोगाने संपूर्ण देशात सह महाराष्ट्रात थैमान घातले असून अनेक ठिकाणी मास्क मिळवण्यासाठी मेडिकलवर गर्दी दिसून येत आहे. तर काही ठिकाणी तुटवडा निर्माण झालेला आहे. या रोगापासून बचाव करण्यासाठी मास्कची नितांत गरज लक्षात आहे.ही गरज लक्षात घेऊन युवा विकास सोसायटी द्वारा राजुरेश्वर स्किल डेव्हलपमेंट सेंटर किनवट पी एम के व्ही वाय च्या सेल्फ एम्पलायीज टेलर कडून दिवस-रात्र मास्क बनविले चालू आहे. राजुरेश्वर स्किल डेव्हलपमेंट सेंटर द्वारा किनवट येथील नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना मोफत मास्क चे वाटप करण्यात आले. या प्रसंगी किनवट नगरपालिकेचे नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, राजुरेश्वर स्टील स्किल सेंटरचे संचालक श्री सुरेश रंगनेनिवार, चंद्रकांत नेम्मानिवार,नरसिंग तक्कलवार नगरपालिकेचे अधीक्षक चंद्रकांत दुधारे आदी उपस्थित होते.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Anand Bhalerao (Editor in Chief) 9421585350. सूचना -- या इंटरनेट न्युज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखा मधून व्यक्त झालेल्या मताशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही.

1 thought on “किनवट: युवा विकास सोसायटी द्वारा राजुरेश्वर स्किल डेव्हलपमेंट सेंटर कडून मास्कचे मोफत वाटप.

Comments are closed.