kinwat today news
औरंगाबादेत-कोरोनाचा-तिसरा-बळी,-बिस्मिल्ला-कॉलनीतील-वृद्धेचा-मृत्यू,-रुग्णसंख्याही-वाढली

नांदेड जिल्ह्यात कोरोना संसर्ग नियंत्रणात, दिलासादायक परिस्थिती कोरोना : आतापर्यंत 378 नमुने निगेटीव्ह ; 66 नागरिकांचा तपासणी अहवाल बाकी

नांदेड दि. 21 :- जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना संसर्गाचा एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नसल्याने नांदेड जिल्ह्याची दिलासादायक परिस्थिती आहे. आतापर्यंत एकूण क्वारंटाईन असणाऱ्या नागरिकांची संख्या 683 आहे. यामधील क्वारंटाईन कालावधी पूर्ण झालेली 222 असून सध्या निरीक्षणाखाली असलेले 89 नागरिक आहेत. यापैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये 70 नागरिक आहेत. तसेच घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले 613 अशी संख्या आहे.

आज तपासणीसाठी 66 नागरिकांचे नमुने घेतले होते. आजपर्यंत एकुण 449 नमुने तपासणी झाले आहेत. यापैकी 378 नमुने निगेटीव्ह आले असून 66 नमुने तपासणी अहवाल येणे बाकी आहे. तसेच 5 नमुने नाकारण्यात आली आहेत.

जिल्ह्यात बाहेरुन आलेले एकूण प्रवासी 77 हजार 676 असून त्यांना त्यांच्या घरीच राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य विभाग नांदेड यांनी दिली आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

4 thoughts on “नांदेड जिल्ह्यात कोरोना संसर्ग नियंत्रणात, दिलासादायक परिस्थिती कोरोना : आतापर्यंत 378 नमुने निगेटीव्ह ; 66 नागरिकांचा तपासणी अहवाल बाकी

Leave a Reply