kinwat today news

खासदार हेमंत पाटील हिंगोली लोकसभा क्षेत्रात कोरोना लढ्यात उतरले रस्त्यावर अनेक भागात दौरा.

किनवट टुडे न्युज: वसमत कृषी उत्पन्न बाजार समिती येथे काल हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंतभाऊ पाटील यांनी भेट देऊन यार्डात सामाजिक अंतर ठेऊन शासन नियमाप्रमाणे हळद लिलाव व शेतीमाल खरेदी विक्री चालू करण्यात यावी यासाठी जिल्ह्याप्रशासनाला सूचना देऊन शेतीमाल खरेदी विक्री व्यवहार सुरळीत चालू झाला असून यावेळी वसमत कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजेश इंगोले पाटील, उपजिल्हाप्रमुख सुनील काळे,जि. प.संदस्य रवी नादरे,काशिनाथ भोसले,नगराध्यक्ष सुनील पोराजवार,बाबा अफूने,विशाल कडतन,सभासद व शिवसेनेचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
आज हिंगोली येथील गजराज बाल गणेश मंडळ यांच्यामार्फत गोरगरिबांना भरवू घास,पूर्ण करू मदतीचा ध्यास. हा उपक्रम कोरोना पार्श्वभूमीवर गरजूंसाठी राबविण्यात येत आहे सामाजिक बांधिलकीचा वसा ठेवून सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या गजराज बाल गणेश मंडळच्या वतीने कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाउनच्या काळात प्रामुख्याने गोरगरीब,हातावरचे पोट असलेल्या गरजू कुटुंबांना अन्नपूर्णा किट देण्यात येत आहे! खासदार हेमंतभाऊ पाटील यांनी आज भेट देऊन पाहणी केली. अशा संकटकाळात समाजातील सर्व सामाजिक संस्थानी कर्तव्यभावनेने पुढे आले पाहिजे असे मतही व्यक्त केले.
यावेळी जिल्हाप्रमुख तथा आमदार संतोष बांगर,सभापती फकीरा मुंढे, नगरसेवक राम कदम,किशोर मास्ट,राजू जैस्वाल, शिवसेना पदाधिकारी व मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
देशात लाँकडाऊन असल्यामुळे वर्तमान पत्राची छपाई बंद आहे त्यामुळे त्याचा परिणाम वर्तमान पत्र वाटप करणाऱ्या मुलांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी *हिंगोलीचे लोकसभेचे लोकप्रिय खासदार हेमंत भाऊ पाटील* यांनी हिंगोलीतील वर्तमानपत्र वाटप करणाऱ्या मुलांना धान्याचे कीटचे वाटप केले यामध्ये त्यांना गहू,तांदूळ आणि स्वयंपाकासाठी लागणारे अत्यावश्यक साहित्य वाटप केले आहे.यावेळी
मा.खा शिवाजीराव माने, हिंगोली शिवसेना समन्वयक दिलीप भाऊ बांगर,भैय्या पाटील गोरेगावकर, उपजिल्हाप्रमुख सुनील भाऊ काळे ,वसमत नगराध्यक्ष श्रीनिवास पोरजवार, हिंगोलीचे उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, जि.प. सदस्य माऊली झटे ,माजी जि.प.सदस्य रविभाऊ नादरे, डॉ सोमेश्वर पतंगे, किशोर मास्ट, बाबा आफुने,विशाल कडतन, उपविभागीय अधिकारी आतुल चोरमारे, हिंगोली नगरपरिषदेचे मुख्यधिकारी रामदास पाटील, तसेच पत्रकार बांधव, व इलेक्ट्रॉनिक मिडियाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार श्री. हेमंत पाटील यांची भरारी अन्नछत्राला अस्थेने भेट देऊन अन्नछत्र च्या कामगिरीची विचारपूस करून पाठीवर हात ठेऊन मंडळीशी संवाद साधला. स्वयंपाक, पॅकिंग व वितरण संदर्भात अन्नछत्रचे सहसमन्वयक डाॅ. श्री. संजय कयाल, श्री. सतिश लदनिया, श्री. कैलाश नेनवाणी, श्री. अमित लदनिया यांनी माहिती दिली. खासदार श्री. हेमंत पाटील यांचे अन्नछत्रचे सहसमन्वयक श्री. गोविंद बियाणी, श्री. लोखंडे गुरूजी, श्री. संजय भुमरे, श्री. प्रा. नरेंद्र रायलवार यांनी स्वागत केले. अतिशय गरजूंना दोन्ही वेळा जेवण वितरण व्यवस्थे बद्दल खासदार महोदयांनी भरारी अन्नछत्रचे कौतूक केले. कोरोना च्या मोठ्या संकटाशी लढताना खारीचा वाटा उचलताय, या बद्दल टिम भरारी अन्नछत्र दाते व सेवेकरी कौतुक करावे तेवढे कमीच आहे, असे खा. श्री. पाटील म्हणाले. यावेळी अॅड. श्री. मणिष साकळे, श्री. राजीव जयस्वाल, श्री. किशोर मास्ट उपस्थित होते.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. ग्रामीण भागातून लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळाला.या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंतभाऊ पाटील यांनी औंढा नागनाथ येथील रुग्णालयास भेट दिली.
क्वारंनटाईन सुविधा, उपाययोजनांचा आढावा घेतला. व त्यांच्या सुविधेची, साहित्याची पाहणी केली. कोरोनाच्या उपाययोजना कशा पद्धतीने केल्या आहेत याची सविस्तर माहिती घेतली. कोरोना संसर्गाचा धोका वाढू नये यासाठी निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया करावी अशा सूचनाही खासदार हेमंत भाऊ पाटील यांनी यावेळी दिल्या.
यावेळी तहसिलदार पांडुरंग माचेवाड,जि प सदस्य माऊली झटे, तालुका आरोग्य अधिकारी आदी उपस्थित होते.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply