kinwat today news

साईबाबा संस्थानच्या वतीने 100 गरीब कुटूंबाला धान्याचे वितरण

किनवट टुडे न्युज: किनवट शहरातील साईबाबा संस्थान नित्य अन्नदान सेवा समितीचे प्रमुख असलेले गुरुस्वामी पवार यांनी 20 एप्रिल रोजी साई मंदिर येथे निराधार लोकांना 15 दिवसाचे पुरेल असे जवळ जवळ शंभर कुटुंबांना धान्याचे वाटप करण्यात आले. लॉकडाऊन’मुळे ज्या नागरिकांना घराच्या बाहेर येऊन मजुरी करणे कठीण आहे अशा हातावर पोट असलेल्या नागरिकांना या साहित्याचे वाटप सकाळी 11 वाजता श्री साईबाबा संस्थान किनवट सभागृहात आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल, तहसीलदार नरेंद्र देशमुख, माजी नगराध्यक्ष के मूर्ती, प्राध्यापक किशनराव किनवटकर आदि उपस्थित होते.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply