कोविड 19 व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय निर्देशांचे काटेकोर पालन करावे — जिल्हाधिकारी विपीन इटनकर

नांदेड, दि.19:- कोविड-19 व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय निर्देशाची अंमलबजावणी आपत्ती व्यावस्थापन कायदा 2005 मधील तरतुदीनुसार करणे अनिवार्य असुन दोषीविरुध्द दंडात्म् क कार्यवाहीचा प्रावधान आहे.
सार्वजनिक स्थळ, सर्व सार्वजनिक व कामाच्याा ठिकाणी चेह-यावर मास्क, रुमाल वापरणे बंधनकारक आहे.भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सार्वजनिक स्थळी तसेच कामाचे ठिकाणी सामाजिक अंतराचा(Social Distancing) नियम पाळण्याची खात्री करण्यात यावी. कोणतीही संस्था अगर व्युवस्थापक हे सार्वजनिक ठिकाणी 5 किंवा त्यापेक्षा जास्त जणांचा जमाव होऊ देणार नाही. अंत्यसंस्कार या ठिकाणी होणारे जमाव आदेशात नमुद तरतुदीनुसार नियंत्रित करावे. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास आदेशात नमुद तरतुदीनुसार दंडात्मक कार्यवाही करावी. तसेच दारु,गुटखा, तंबाखू इ. च्या विक्रीवर कडक निर्बंध असतील. थुंकण्यानस सक्त मनाई असेल. अशा व्यहक्ती विरुध्दख आदेशात नमुद तरतुदीनुसार कारवाई करावी.

कामाचे ठिकाण

सर्व कामाच्या ठिकाणी संबंधीत विभागप्रमुख / आस्थाप्रमुख यांनी तापमान तपासणीसाठी पुरेशी व्यवस्था असेल आणि तेथे सॅनिटायझर्स उपलब्ध करुन देण्यात यावी. कामाच्या ठिकाणी शिफ्ट दरम्यान एक तासाचे अंतर असेल आणि सामाजिक अंतर(Social Distancing)सुनिश्चित करण्यासाठी कर्मचा-यांच्यास भोजन अवकाश कालावधीमध्ये शिथीलता ठेवावी. 65 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील व्यक्ती,सह-रुग्ण,5 वर्षाखालील मुलांच्या पालकांना घरातून काम करण्यास प्रोत्साहित करावे. खासगी आणि सार्वजनिक अशा सर्व कर्मचा-याना आरोग्यसेतुच्या वापरास प्रोत्साहित केले जावे. सर्व संस्थांनी आपले कामाची ठिकाणे शिफ्टबदली दरम्याान निर्जंतुकीकरण करुन घ्यावीत. मोठया बैठका टाळाव्यात.

उत्पाादन आस्थांपना
सामान्यतः वारंवार साफसफाई व हात धुणे अनिवार्य करावे. शिफ्ट बदलामध्ये अंतर असावा. कॅन्टीनमधील भोजनावेळी सामाजिक अंतराचे पालन करावे. सुसंवाद व संभाषणाच्या् माध्यमातुन स्वाच्छते बाबत प्रशिक्षण घेतले जावे, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कळविले आहे.
0000

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Anand Bhalerao (Editor in Chief) 9421585350. सूचना -- या इंटरनेट न्युज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखा मधून व्यक्त झालेल्या मताशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही.